दैनिक स्थैर्य | दि. ५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
ग्रामीण कृषी कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२३-२४ कार्यक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय फलटणतर्फे दुधेबावी, ता. फलटण येथे माती परीक्षण संबंधी जनजागृती व्हावी यासाठी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
यामध्ये पिके काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी रासायनिक खते देण्यापूर्वी किंवा खते दिल्यानंतर तीन महिन्यांनी मातीचा नमुना घ्यावा. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करावा, असं सल्ला कृषीदूतांनी शेतकर्यांना दिला. याबरोबर शेतातील मातीचे नमुने गोळा करण्याचे परीक्षण देण्यात आले.
मातीमध्ये असणारे घटक जमिनीचा सामू मातीचा प्रकार, याविषयी शेतकर्यांना योग्य ते मार्गदर्शन देण्यात आले. दराडे राजवर्धन, तावरे संकेत, भोसले यश, फाळके दिग्विजय, मेनकुदळे शिवम या कृषीदूतांनी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिषा पंडित व विषय विशेषतज्ञ प्रा. जी. एस. शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले.