
स्थैर्य, फलटण, दि. 16 डिसेंबर : सासकल येथे कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी शेतकर्यांना माती परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
कृषीदूतांनी जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण करावे,याबाबत माहिती दिली. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक घटकांची पूर्तता जमिनीतून होत असते. त्यासाठी योग्य खत नियोजन करताना माती परीक्षण अहवाल लाभ होतो. माती परीक्षणातून उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय कर्ब,जमिनीतील क्षारांचे प्रमाण आधीची माहिती मिळते याबाबत शेतकर्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. पीक काढल्यानंतर किंवा पेरणीपूर्वी तीन महिन्यांनी पूर्वी मातीचा नमुना पाठवावा. जमिनीची एकरूपता रंग, सुपीकता, खडकाळपणा ,उंच सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाडून 5 ते 18 नमुना गोळा करावे. आदी विविध बाबींची माहिती यावेळी देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.डी. निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन. ए. पंडित, डॉ. जी. बी. अडसूळ, विषय विशेषज्ञ प्रा. जी. एस शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत श्रेयश शिंगाडे, स्वरूप चव्हाण, गौरव भोसले, श्रीराज मांजरकर, तेजस शिंदे, आदित्य पवार, सुमित शेवाळे, प्रसाद मुळीक यांनी हा उपक्रम यशस्वी केला.

