सामाजिक कार्यकर्त्यांकडून ओंकार वृद्धाश्रमात औषध व प्रथमोपचार साहित्याचे वाटप


स्थैर्य, फलटण, दि.11 नोव्हेंबर : करवली (ता. फलटण) येथील ओंकार वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी विविध प्रकारची औषधे व प्रथमोपचार साहित्याचे वाटप सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून करण्यात आले.
फलटण येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने ओंकार वृद्धाश्रमाद्वारे समाजसेवेचा सुंदर उपक्रम राबवत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी आजी, आजोबांना कफ सिरप औषध, प्रथमोपचार साहित्य, आणि केळीची भेट देण्यात आली.

या उपक्रमात सामाजिक कार्यकर्ते अजय शिंदे, तुषार कुचेकर, विजयभाऊ सूर्यवंशी, रशीद शेख, रणजितसिंह खानविलकर, अमृत पवार, पै. प्रकाश तेली, संदीप बिडवे, शैलेश इंगळे, शैलेश नलवडे, तसेच लॅब असिस्टंट प्रशांत बनकर साहेब हे सहभागी झाले होते.

या उपक्रमाद्वारे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा तसेच त्यांच्या दैनंदिन गरजांमध्ये मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापुढे अशा प्रकारच्या सेवा उपक्रमांद्वारे समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. समाजातील इतरांनीही अशा कार्यातून प्रेरणा घ्यावी, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!