सामाजिक प्रभाव पाडणा-या विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी ‘सोशल स्कॉलरशिप्स’

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२२ । मुंबई ।  विद्यार्थी घडवण्यासाठी ग्रेड्स हे एकमेव घटक नाहीत आणि युनिव्हर्सिटी लिव्हिंग ही जागतिक विद्यार्थी निवास प्रदाता कंपनी या विधानाशी ठाम आहे. नुकतेच सादर केलेल्या आपल्या सोशल स्कॉलरशिप्सना अधिक पुढे घेऊन जात युनिव्हर्सिटी लिव्हिंगने युकेमधील सहा ठिकाणी इन-हाऊस सोशल स्कॉलरशिप्स सादर केल्या आहेत.

लंडन, बर्मिंगहॅम, लिव्हरपूल, कॉव्हेंट्री, शेफिल्ड आणि लीसेस्टरमधील युनिव्हर्सिटींमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत. यापैकी ५ युनिव्हर्सिटीजमधील मूल्य १००० पौंड आहे, तर लंडनमधील स्कॉलरशिप्स तीन श्रेणींमध्ये विभागण्यात आल्या आहेत – १००० पौंड, १५०० पौंड आणि २५०० पौंड. राष्ट्रीयत्व कोणतेही असो जगभरातील विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिप्स देण्यात येतील. इन-हाउस सोशल स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांच्या निवास खर्चाचा काही भाग समाविष्ट असेल आणि युनिव्हर्सिटी लिव्हिंग व्यासपीठाद्वारे बुक केलेल्या कोणत्याही निवासासाठी वैध आहे. विद्यार्थ्यांनी फक्त ऑनलाइन फॉर्म भरणे, युनिव्हर्सिटी लिव्हिंगद्वारे त्यांची निवास व्यवस्था बुक करणे, त्यांनी निर्माण केलेला सामाजिक प्रभाव स्पष्ट करणारा व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि तो व्हिडिओ युनिव्हर्सिटी लिव्हिंग (@uni.living) ला टॅग करून इन्स्टाग्रामवर अपलोड करणे आवश्यक आहे.

युनिव्हर्सिटी लिव्हिंगचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ अरोरा यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांवर चांगले गुण मिळवण्यासाठी, उच्च कौशल्ये मिळविण्यासाठी आणि सतत पुढे जाण्यासाठी दबाव वाढत असताना, युनिव्हर्सिटी लिव्हिंगमध्ये आम्ही विचार केला की सामाजिक जबाबदारी माहिती असणे महत्त्वाचे आहे यावर भर देण्याची गरज आहे. काही गंभीर सामाजिक समस्या आहेत, ज्याकडे आपले लक्ष देण्याची गरज आहे हे समजून घेतल्याने भावी पिढ्यांना येणा-या बदलांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत होईल.”

युनिव्हर्सिटी लिव्हिंगचे सह-संस्थापक व सीओओ मयंक महेश्वरी म्हणाले, “सोशल स्कॉलरशिप्स आमच्या मनाच्या खूप जवळ आहेत. आम्ही विद्यार्थ्यांचे कौतुक करतो आणि त्‍यांचा आमच्यावरचा विश्वास यासाठी आमची विद्यार्थ्यांचे ऋण फेडण्याची इच्छा होती. गुण हे पात्रता निकष म्हणून मानले जाऊ नये, तर विद्यार्थ्यांमधील सामाजिक जागरूकतेच्या पातळीला महत्त्व दिले पाहिजे. त्या विद्यार्थ्यांनी या कार्याप्रती सक्रियपणे योगदान दिले आहे आणि परिवर्तनाला चालना देण्यास मदत केली आहे अशा विद्यार्थ्यांचे आम्ही अर्ज करण्यासाठी खुल्या मनाने स्वागत करतो.”

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट एस.बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अॅण्ड डिझाइनची विद्यार्थिनी तेजस्विनी देशमुख हिने प्रथमच ५००० पौंडची विशेष स्कॉलरशिप जिंकली आहे. ही सोशल स्कॉलरशिप होती, जी युनिव्हर्सिटी लिव्हिंगने नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटी, लंडन येथे अर्ज करणा-या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या पहिल्या स्कॉलरशिप्सपैकी एक आहे. एम.एससी. इन डिजिटल आर्किटेक्चर अॅण्ड कंस्ट्रक्शनचे शिक्षण घेण्यासाठी ती यावर्षी सप्टेंबरमध्ये नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीत प्रवेश करणार आहे.


Back to top button
Don`t copy text!