
दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२५ । फलटण । कमीन्स कंपनीच्या माध्यमातून फलटण तालुक्यात जो सीएसआर निधी दिला जातो. त्यामध्ये शाशकीय कार्यालयात जर त्यामध्ये काही मागितले तर कमीन्स कंपनीच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून ते देण्यात येत नाही, कमीन्स कंपनीच्या अधिकारी यांनी यामध्ये सुधारणा करावी. अधिकाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी मी म्हणजे ढोले साहेब नाही, जर आम्हाला सीएसआर निधी मिळाला नाही तर कमीन्स कंपनीचे पाणी मी बंद करेन, असा सज्जड दम फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी दिला आहे.
फलटण येथील तहसील कार्यालयात आयोजित बैठकीत प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर बोलत होत्या. यावेळी आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह कमीन्स कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
कमीन्स कंपनीच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून फलटण शहरात व तालुक्यात विविध कामे करण्यात येत असतात. त्यामध्ये फलटणच्या प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी सीएसआर निधीच्या बाबत मोठी खंत व्यक्त केली, त्यावेळी त्या बोलत होत्या.