स्थैर्य, जयपूर, दि १५: राजस्थानमध्ये रविवारी अचानक वातावरण बदलले. जयपूर आणि बारांमध्ये अचानक वादळासह जोरदार पावसाने हजेरी लावली. जयपूरमध्ये काही ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे अनेक घरांच्या छतावर बर्फाची चादर पसरलेली दिसली.
हवामान विभागाने पूर्व राजस्थानच्या कोटा, बारां, भरतपूर, अलवर, झुंझनूं, सीकर, सवाई माधोपूर, टोंक, धौलपुर आणि जयपूर जिल्ह्यांसह पश्चिम राजस्थानच्या हनुमानगड, चूरू, श्रीगंगानगरसाठी रविवारी रात्रीपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जयपूरमध्ये वादळासह जोरदार पाऊस
जयपूरमध्ये सकाळपासून वातावरण बदलेले आहे. दुपारपर्यंत सर्वत्र ढग पसरले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. शहरातील मानसरोवर, दुर्गापूरा, मालवीयनगर, सोडाला, सहकार मार्ग, बाइस गोदाम, सी स्कीम सिव्हिल लाइंसमध्ये गाराही पडल्या.
अचानक वातावरण का बदलले ?
अफगाणिस्तान आणि आसपासच्या क्षेत्रात बनलेल्या पश्चिम क्षेत्र वादळात बदलत आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात काल तापमान 2 ते 3 डिग्रीपर्यंत वाढले होते, पण पावसामुळे परत थंडी वाढली. हिवाळ्यात आलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या पावसामुळे सर्दी-तापेचे रुग्ण वाढू शकतात.