जिजाऊ सेवा संघाच्या वतीने स्नेहमेळावा संपन्न


दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२४ | बारामती |
बारामती तालुका मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ सेवा संघाच्या वतीने बारामती शहर व तालुक्यातील महिलांसाठी मकर संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकू व स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी अध्यक्षा स्वाती ढवाण, उपाध्यक्ष संगीता शिरोळे, कार्याध्यक्ष मनीषा शिंदे, प्रियंका नलावडे सहकार्याध्यक्ष, अर्चना परकाळे सचिव, कल्पना माने सहसचिव, सारीका परकाळे खजिनदार, ज्योती खलाटे सहखजिनदार, सदस्या सुनंदा जगताप, प्रतिभा बर्गे, ऋतुजा नलावडे, विद्या निंबाळकर, रजनी सावंत, सारिका मोरे, मनीषा खेडेकर व मार्गदर्शिका जयश्री सातव, छाया कदम, विजया कदम, हेमलता परकाळे आदी महिला उपस्थित होत्या.

भारतीय संस्कृती व शेतीपूरक व्यवसाय यामध्ये विविध फळे, भाज्या, व पशूधनाचा आकर्षक देखावा अर्चना परकाळे यांनी सादर केला तर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणार्‍या गुणवंत महिलांचाही सन्मान करण्यात आला.

हळदी-कुंकूवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये उत्तम आणि उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलांना एकत्रित आणणे आणि त्यांच्यामधील कलागुणांना वाव देणे यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे जिजाऊ सेवा संघाच्या अध्यक्षा स्वाती ढवाण यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!