स्थैर्य, लोणंद, दि.०३: लोणंद पोलिसांनी अलिशान गाडीतून अवैधरित्या होणारी चोरटी वाहतूक पाठलाग करून पकडली. या कारवाईत सुमारे 93 हजार 480 रुपयांची दारू आणि अलिशान गाडी जप्त करण्यात आली आहे.
लोणंद निरा रोडवर चोरटी मद्य वाहतूक होणार असल्याच्या गुप्त माहितीवरून लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथक आणि स्टाफला नाकेबंदीच्या सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानूसार पोलीस पथकाने पाठलाग करुन संशयित अलिशान कार फॉरच्युनर कार ताब्यात घेवुन खात्री केली असता सदर गाडीत एकुण 30 देशी दारुचे बॉक्स व 01 बिअरचा बॉक्स असा अवैध दारुसाठा मिळून आला. पोलीसांनी 15 लाखांची फॉरच्युनर कार व 93 हजार 480 रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. तसेच धिरज संजय बर्गे रा. आझाद चौक कोरेगाव ता. कोरेगाव, मयुरेश हणमंत शिंदे रा. संभाजीनगर कोरेगाव ता. कोरेगाव, योगेश ऊर्फ बाबासाहेब आनंदराव बर्गे रा. अजिंक्य कॉलनी कोरेगाव ता. कोरेगाव या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.
गुन्ह्याचा पोलीस अधीक्षक सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो. ना. संतोष नाळे, अमोल अडसुळ, महेन्द्र सपकाळ, अभिजित घनवट, फैय्याज शेख यांनी कारवाईत सहभाग घेतला. गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक संतोष नाळे करीत आहेत.