दैनिक स्थैर्य | दि. 25 सप्टेंबर 2023 | फलटण | शहरामध्ये काल काही युवक काही दुकानांमध्ये घुसून गुंडगिरी करत फलटण शहरातील सर्वसामान्य व्यापाऱ्यांना त्रास देत होते; तर अशा त्रास देणाऱ्यांना वेळीच ठेचा. फलटण शहरातील व्यापारी वर्गाच्या पाठीमागे आम्ही ठामपणे असून आगामी काळात कोणत्याही व्यापाऱ्यांना व व्यावसायिकांना त्रास झाला तर त्यांच्या आधी मला कायदा हातात घेण्यास भाग पाडू नका असा इशारा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिला.
शहरामध्ये व्यापाऱ्यांसहित सर्वसामान्य नागरिकांमध्ये काल घडलेल्या प्रकारामुळे भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घाला व गुंडगिरी करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या फलटण शहर हे शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते त्यामुळे फलटण शहरामध्ये अशा घटना घडू नयेत याबाबत काळजी घ्यावी; असे निर्देश खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
अशा पद्धतीने जे लोक कार्य करत असतात ते मग कोणत्याही पक्षाचे, गटाचे किंवा संघटनेचे असो त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करा व अशा प्रवृत्तीला आळा घाला; असेही खासदार निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.