स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ जुलै २०२२ । सातारा । राष्ट्रीय आरोग्य विषयक 2017च्या धोरणानुसार सर्व नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्यस्तर प्राप्त करुन देणे क्रमप्राप्त आहे. या धोरणानुसार सार्वजनिक आरोग्य सेवेचा दर्जा उंचाविला तर नागरिकांना मोठ्या समप्रमाणात आरोग्य सेवा प्राप्त करुन घेता येणार आहेत.  सातारा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दर्जेदार गुणवत्तापूर्वक सर्व सामवेशक सेवा देण्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करण्याची संकल्पना राबविण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्मार्ट करताना भौतिक सुविधांमध्ये बदल करणे, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण व सक्षमीकरण करणे व नियमावली नुसार शिष्टाचार सेवा प्रदान करणे यावर भर देण्यात येणार आहे.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्मार्ट भौतिक पायाभूत सुविधा, स्मार्ट मनुष्यबळ, स्मार्ट संदर्भसेवा, स्मार्ट माहिती व तंत्रज्ञानाचा वापर व पर्यावरण संतुलित स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र या बाबींचा समावेश असणार आहे.

रुग्णसेवा दर्जेदार होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधांमध्ये एकसमान बदल करणे, आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी जनतेचा सहभाग वाढविणे, आरोग्य संस्थांमधील उपलब्ध यंत्र व साधनसामुग्री रुग्णसेवेसाठी अद्यावत करणे व आरोग्य संस्थांमध्ये नैसर्गिक समतोल राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे हे या अभियानाचा उद्देश आहे.

पायाभूत भौतिक सुविधा : यामध्ये विविध मानांकनानुसार विविध कक्षामध्ये पायाभूत सुविधांमध्ये बदल करणे, सोलर एनर्जीचा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आयुष-हर्बल गार्डन, रुग्ण अनुकूल वातावरण.

यंत्रसामुग्रीची देखभाल : दर्जेदार रुग्णसेवेसाठी आवश्यक साधनसामुग्री, रुग्णालयातील साधनसामुग्रीचे नियमावली नुसार देखभाल करणे, साधनसामुग्रीचे एएमसीद्वारे देखभाल करणे. तसेच मनुष्यबळाचे विविध प्रशिक्षणाद्वारे सक्षमीकरण (सॉफ्टवेअर व टेक्निकल) करण्यात येणार आहे.

सर्वसमावेश दर्जेदार आरोग्य सेवा : आरोग्य संस्थेमध्ये निर्देशकांची उपेक्षित पातळी गाठण्यासाठी सनियंत्रण व मुल्यमापन व पाठपुरावा. तत्पर अत्यावश्यक सेवा व तत्पर संदर्भ सेवा.

जनसहभाग : आरोग्य सेवामध्ये जनतेचा सहभाग वाढविणे. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत जनसहभाग वाढविण्यासाठी रुग्ण व नातेवाईकांचे अभिप्रायानुसार आरोग्य सेवा पुरविणे.

जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद स्वनिधी, सीएसआर, राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्थानिक विकास निधी, सेवाभावी संस्था, 15 वा वित्त आयोग व लोकसहभाग या माध्यमातून भौतिक सुविधा परिपूर्ण करण्यात  येणार आहेत.

प्रसतिगृह, शस्त्रक्रियागृह, बाह्य रुग्ण विभाग, आंतर रुग्ण विभाग, प्रयोगशाळा, औषध भांडार, संगणक कक्ष, सोलर उर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, स्वागत कक्ष, अंतर्गत रस्ते, सरंक्षण भिंत, परिसर सुशोभिकरण, आयुष गार्डन, कॅटल ट्रॅप व प्रसाधनगृह या भौतिक सुविधा अपेक्षित आहेत.

स्मार्ट प्रसतुतिगृह : यामध्ये अत्याधुनिक लेबर टेबल, अत्याधुनिक शॅडोलेसर लॅम्प, कॅबिनेट फॉर औषधे व सामुग्री, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, बेबी वॉर्मर, सक्शन मशिन, स्ट्रेचरल विथ ट्रॉली, व्हिल चेअर व स्वतंत्र प्रसाधनगृह अशा सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.

शस्त्रक्रिया गृह : अत्याधुनिक शॅडोलेस लॅम्प, अत्याधुनिक ओ.टी. टेबल, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, ऑटोक्लेव्ह, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर, ट्युबेकटॉमी किट, स्टरलायजेशन किट, स्टरलायजेशन संच तसेच शस्त्रक्रियागृहामध्ये अँटीमायक्रोबियल (प्रतिजैविक) पॅनेलचा वापर अत्याधुनिक तापमान व आद्रता नियंत्रणप्रणाली उभारण्यात येणार आहे.

आंतररुग्ण विभाग : एकसारखे सेमी फाऊलर बेड, मॅट्रेससह, एकसमान नर्सिंग स्टेशन, स्वतंत्र सुसज्ज आल्हाददायी वातावरण, एकसमान बेड साईड लॉकर, एकसारखे दोन बेडमधील पडदे व एकसारखे दिवसनिहाय स्वच्छ व आकर्षक बेडशिट, स्वतंत्र व स्वच्छ  प्रसाधनगृह.

प्रयोगशाळा : कलरी मिटर, ग्लुको मिटर, बायनाक्युलअर मायक्रोस्कोप, आऊटसोरसिंग लॅब (एचएलएल), तपासणीसाठी लागणारे रसायने व द्रव्य यांची उपलब्धता व पुरवठा यावर ई-औषधीसारख्या तंत्रज्ञानाद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. या प्रयोगशाळेत टी.बी., डेंग्यु, मलेरिया, बायोमिस्ट्री व हिमॅटॉलॉजी या प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.

स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अभियानांतर्गत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!