कृषि महाविद्यालयात येथे कौशल्य विकास अभ्यासक्रम अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन


दैनिक स्थैर्य । 11 जून 2025। फलटण । येथील कृषि महाविद्यालय येथे अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा अभिमुखता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्नित कृषि महाविद्यालय, फलटण येथील कृषि पदवीच्या शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांचा अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा अभिमुखता कार्यक्रम कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रम अंतर्गत सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा, अंळिबी उत्पादन तंत्रज्ञान, दुध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया व उत्पादन, भाजीपाला व फुलांची संरक्षित लागवड, माती, पाणी व पिक खतांचे विश्लेषण आणि अन्न प्रक्रिया इत्यादी शेतीपूरक व्यवसायांचे अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाची निवड करण्यात आली आहे.

कार्यक्रमाची प्रास्ताविक शैक्षणिक विभागाचे प्रमुख डॉ. जी. एस. धायगुडे यांनी अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रम, महत्व व अवलंबन याबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त निविष्ठा अभ्यासक्रम अंतर्गत गांडुळखत, व्हर्मीवॉश, दशपर्णी अर्क, पंचगव्या, बीजमृत, जीवामृत, नीमास्त्र, निंबोळी अर्क इत्यादी कृषि निविष्ठा संबंधित अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश होतो. अंळिबी उत्पादन तंत्रज्ञान अंतर्गत धिंगरी अळिंबीच्या विविध प्रजातींचे उत्पादन, विविध खाद्य पदार्थ निर्मिती व विक्री व्यवस्थापण संबंधित अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश होतो. दुध आणि दुग्धजन्य पदार्थ प्रक्रिया व उत्पादन अभ्यासक्रम अंतर्गत पनीर, खवा, बासुंदी,गुलाब जामून, बर्फी, श्रीखंड, कलाकंद, पेढा, लस्सी, आईसक्रीम, मिल्कशेक, रबडी, कुल्फी, रसगुल्ला, मिल्क फालुदा संबंधित अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश होतो.भाजीपाला व फुलांची संरक्षित लागवड अंतर्गत संरक्षित तापमान अंतर्गत विविध भाजीपाला व फुले लागवड तंत्रज्ञान संबंधित अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश होतो. माती, पाणी व पिक खतांचे विश्लेषण अंतर्गत विविध प्रकारच्या मृदा, पाणी व पिकांसाठी लागणारी विविध खते यांचे विश्लेषण संबंधित अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश होतो. अन्न प्रक्रिया अंतर्गत अन्न तंत्रज्ञान, प्रक्रिया, बेकरी पदार्थ, प्रक्रियायुक्त पदार्थ संरक्षण व तंत्रज्ञान संबंधित अनुभवाधारित कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा समावेश होतो.

प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी कृषि कौशल्य विकास अभ्यासक्रमांतर्गत तांत्रिक व शास्त्रोक्त प्रशिक्षण विद्यार्थींना देवून त्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात येत आहे तसेच अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून परिसरातील शेतकरी, महिला, महीला बचत गट , सुशिक्षित तरूण बेरोजगारांना मार्गदर्शन व जनजागृती करून शेतकर्‍यांच्या विविध शंकाचे निरसन विद्यार्थी करीत आहेत, महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरवासिता उपक्रम, शिकाऊ प्रशिक्षण – भारताच्या भविष्यासाठी कुशल मनुष्यबळ तयार करणे या योजनेचे सविस्तर माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी अनुभवाधारीत कृषि कौशल्य अभ्यासक्रमाचे प्रा. पी. ए. जगदाळे, प्रा. एस. एस. आडत, प्रा. आर. व्ही. कर्चे, प्रा. जी. एस. शिंदे, प्रा. एस. डी. रोमन, कृषि विस्तार विभागाच्या प्रा. एन. एस. ढाल्पे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जी. एस. धायगुडे व आभार प्रा. एम. व्ही. पवार यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!