स्थैर्य, फलटण, दि. ६ : शेतातील बांध फोडल्याचा जाब विचारला म्हणून खामगाव ता. फलटण येथे केलेल्या मारहाणीत सहा जण जखमी झाले असून या प्रकरणी तालुक्यातील मुरुम येथील दहा तर खामगाव येथील चौघे अशा एकुण चौदा जणांविरुध्द फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिलेली माहिती अशी की, खामगाव ता. फलटण येथे गट नंबर २१३ मध्ये राजेंद्र अंकुश कुचेकर यांची जमिन आहे. शुक्रवार दि. ५ मार्च रोजी सकाळी भानुदास शिंदे, अनिल शिंदे व सागर जाडकर यांनी मिळून या जमिनीतील बांध बैलाच्या नांगराच्या मदतीने फोडला. याबाबत विचारणा करण्यास कुचेकर हे चुलत बंधू अमित याच्याबरोबर गेले असता त्यांना तेथे शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. या नंतर पुन्हा सकाळी दहाच्या सुमारास थोड्या वेळापुर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन खामगाव येथे कुचेकर यांच्या रहात्या घरी येवून भानुदास रामचंद्र शिंदे, अनिल भानुदास शिंदे, आप्पा रामचंद्र शिंदे, विनोद रामचंद्र शिंदे, विठ्ठल रामचंद्र शिंदे, तुकाराम विठ्ठल शिंदे, सोमनाथ झेंडे, स्वप्निल जगन्नाथ भोसले, अभिजित बोन्द्रे, विक्रम भोसले सर्व रा. मुरुम ता. फलटण व सागर शामराव जाडकर, मोहन बोन्द्रे, कृष्णात दादासो झेंडे, नवनाथ कृष्णा झेंडे सर्व रा. खामगाव ता. फलटण यांनी कुचेकर व त्यांच्या परीवारातील सदस्यांना लाकडी दांडा, लोखंडी गज व खोर्याच्या लाकडी दांड्याने मारहाण करुन शिवीगाळ केली. यामध्ये स्वतः फिर्यादी राजेंद्र अंकुश कुचेकर, संतोष महादेव कुचेकर, अमित रामचंद्र कुचेकर, हिरामण अंकुश कुचेकर, सुमित रामचंद्र कुचेकर व रामचंद्र कुचेकर सर्व रा. खामगाव ता. फलटण हे जखमी झाले. याबाबत पोलीस हवालदार साबळे हे पुढिल तपास करीत आहेत.