शैक्षणीक विश्वासाठी जीवन समर्पित करणारे अशोक पाटील सर ! – अप्पर जिल्हाधिकारी शंकरराव जाधव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२२ । आटपाडी ।  शैक्षणीक विश्वासाठी जीवन समर्पित करणारे अशोक पाटील सर शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्व आहेत.असे उदगार आटपाडीच्या राजारामबापू हायस्कुलचे माजी विद्यार्थी, कोल्हापूरचे अप्पर जिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी काढले .
ग . दि . माडगुळकर हायस्कुल व पदमभुषण वसंतदादा पाटील ज्यूनियर कॉलेज माडगुळेचे प्राचार्य अशोक गणपती तथा ए. जी .पाटील सर ३१ मे रोजी ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत . त्यानिमित्त त्यांचा माडगुळे येथे सपत्नीक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता . त्यावेळी शंकरराव जाधव बोलत होते .
माझे बालपण आटपाडीतच गेले .शालेय जीवनात संपूर्ण परिसर पाहता, अभ्यासता आला . सर्व इरसाल सवगड्यांच्या सोबतीच्या अष्टपैलु वागणूकीतूनच आम्ही सर्व जण घडलो . शिक्षणाचा ध्यास घेतलेले तथापि धाडसी, नीडर, भांडखोर आणि चाकोरी बाहेरच्या इरसाल वागण्याने आम्हा सर्वांच्या भविष्यातल्या मजबुत वाटचालीला बळ मिळाले . शालेय जीवनातील गट, तट, वाद – विवाद, स्पर्धा, भांडणे, शिव्या मारामाऱ्या, सबकुछ आठवले की मन सदगदित होते.अशा जुन्या आठवणींचा, अनेक मित्रांचा उल्लेख करून शंकरराव जाधव यांनी, सेवनिवृत्ती नंतर पुस्तके वाचणे, प्रेक्षणीय स्थळांना भेटी देणे, वगैरे आवडेल ते छंद वाढीस लावत, कार्यमग्न रहात आयुष्याच्या अंतापर्यत निरोगी राहण्याचा सल्ला आपले वर्गमित्र अशोक पाटील सरांना दिला .
प्रारंभीच्या प्रतिकुल परिस्थितीत आम्ही भावंडानी परिस्थितीशी दोन हात केल्यानेच आज चांगले दिवस आले. माझ्या सर्व प्रगतीत वाटचालीत माझ्या सर्व भावडांचा मोलाचा वाटा असल्याचे अशोक पाटील सरांचे थोरले बंधू आटपाडी तालुक्याचे नेते आनंदरावबापू पाटील यांनी गहिवरल्या अंतकरणाने सांगीतले .
आपल्या अध्यक्षीय भाषणात मॉडर्न एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रा . टी . ए . चव्हाण यांनी, अशोक पाटील सरांसारखे शिक्षणाचा, खेळाचा ध्यास घेतलेले व्यक्तीमत्व सेवनिवृत्त होत असल्याबाबत मन अस्वस्थ होत असल्याचे स्पष्ट करून मन, मेंदू, मनगट मजबुत करून सर्वांनी हसा,हसवत रहा, आनंदी जगा, सर्वोत्तम व्हा, हा अशोक पाटील सरांच्या आनंदी जीवनाचा मुलमंत्र सर्वांनी आत्मसात करावा, असे आवाहन चव्हाण सरांनी केले .
येणारा राग परिस्थिती बदलण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी उपयोगात आणण्याचा अशोक पाटील सरांनी दिलेला मुलमंत्र पुढील आयुष्यात उपयोगी आला . संघर्षातून राज्यभर नाव कमावता आले, ही प्रेरणाही अशोक सरांची, या प्रशालेची असल्याची भावना कामगार नेते हरिदास लेंगरे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली .
आपल्या ३७ वर्षाच्या प्रदिर्घ सेवाकाळात अशोक पाटील सर यांनी गदिमा प्रशाला आणि तालुका जिल्हा, स्तरावरील शालेच क्रीडा क्षेत्रासाठी मोठे काम केले . तालुक्यात जिल्हयात होणाऱ्या स्पर्धामध्ये आपल्या प्रशाले बरोबर तालुक्यातील खेळाडू मुले अव्वल यावीत म्हणून प्रयत्न केले . अशा अनेक स्पर्धांमध्ये माडगूळे हायस्कुल च्या मुलांचाच नेहमी विजयी डंका वाजण्यात अशोक सरांचे योगदान मोलाचे ठरले . अनेक राष्ट्रीय खेळाडू घडविणाऱ्या, उच्च विद्या विभुषीत क्रीडा शिक्षक असलेल्या अशोक सरांचे इंग्रजीवर प्रभुत्व असलेने शेकडो विद्यार्थी इंग्रजी सहज शिकून गेले . शांत, संयमी, सोज्वळ, निगर्वी, चारीत्र संपन्न असलेल्या अशोक पाटील सरांचा परिवार राजकीय सामाजीक आर्थीक दृष्ट्या संपन्न आणि आघाडीचा असतानाही अशोक सर सर्वांप्रति विनम्र आणि कर्तव्यतत्पर राहील्याने माडगुळ्या बरोबरच तालुका, जिल्हा स्तरावरील शेकडो जण त्यांचे चाहते बनले . सेवानिवृत्ती नंतर अशोक पाटील सरांनी सर्व समाज्याच्या प्रगतीसाठी यापुढे प्रयत्न करावेत अशी अपेक्षा ही यावेळी अनेक वक्त्यांनी व्यक्त केली .
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी माणीकराव वाघमारे , माजी प्राचार्य जे आर चव्हाण सर, प्रा . प्रियांका माने पाटील, कु . सृष्टी चव्हाण, कु मेघराज हरिदास लेंगरे, वाय. डी. चव्हाण सर यांची अशोक पाटील सरांचा गौरव करणारी भाषणे झाली .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक, मॉडर्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ . एम . व्ही . जाधव सर, मॉडर्न शिक्षण संस्थेचे मुख्य विश्वस्त अजित चव्हाण सर, काँग्रेस आयचे नेते प्रदिप पाटील सर , शहाजीदादा पाटील, प्रा. तानाजीराव पाटील , मुरलीधर आबा पाटील, बाळासाहेब सागर, अशोक लवटे, विजयराव पाटील, अॅड विनोद दाणी, जगन्नाथ खरात, शाम पोतदार, रामभाऊ देशमुख, रघुनाथ सागर, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ. अनिता पाटील, जनार्धन झेंडे, श्री शिंदे सर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते .
प्राचार्य अशोक पाटील सर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. सुनिता पाटील यांचा तसेच माजी मुख्याध्यापक डी . व्ही . नांगरे यांचाही सपत्नीक सत्कार करणेत आला .
कार्यक्रमाचे स्वागत सुरेश गायकवाड यांनी तर प्रास्तावीक एच डी . चव्हाण सर यांनी केले सुत्रसंचालन टी एस पाटील के.डी चांदणे यांनी केले . टी एस . पाटील सर आभार मानले .

Back to top button
Don`t copy text!