१ जुलैपासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १ जुलै २०२४ | मुंबई |
ट्रायने मोबाईल सीमकार्डचे नियम सुरक्षेचा विचार करून बदलले आहेत. त्यानुसार मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिम स्वॅपची फसवणूक टाळण्यासाठी ट्रायने हा नियम लागू केला आहे. त्यामुळे आता सीमकार्डचे दरही बदलणार आहेत.

सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास, तुम्हाला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल. यापूर्वी सिमकार्ड चोरीला गेल्यावर किंवा खराब झाल्यानंतर तुम्हाला दुकानातून लगेच सिमकार्ड मिळायचे. मात्र आता त्याचा लॉकिंग कालावधी वाढवण्यात आला आहे. आता युजर्सना ७ दिवस वाट पाहावी लागेल, त्यानंतरच नवीन सिम कार्ड मिळेल. म्हणजेच चछझ नियमात बदल केल्यानंतर लागू करण्यात आलेल्या पुढील सात दिवसांनंतरच तुम्हाला हे सिमकार्ड मिळेल.

वास्तविक हा निर्णय ट्रायने घेतला आहे. फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक प्रकरणांमध्ये एकदा सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर तो क्रमांक दुसर्‍या सिमकार्डवर अ‍ॅक्टिव्हेट केल्याचे समोर आले आहे. यानंतर आणखी काही घटना घडवून आणल्या जातात. आता ऑनलाइन घोटाळ्यासारख्या घटना रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिसूचना ट्रायने मार्चमध्ये जारी केली होती.

सिम स्वॅपिंग म्हणजे तोच नंबर दुसर्‍या सिम कार्डवर अ‍ॅक्टिव्ह करणे. आता तोच क्रमांक दुसर्‍या सिमकार्डवर घेतल्यावर अशा घटना झपाट्याने वाढत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी सिम स्वॅपिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुरक्षेशी संबंधित नवनवीन नियम आणत असतांनाच ट्रायने नुकतेच स्पष्ट केले आहे की, एक किंवा अधिक सिमसाठी मोबाइल युजर्सना चार्ज करण्यात येणार नाही. सध्या डिऍक्टिव्हेट सिमचे प्रमाण अधिक आहे. अशा परिस्थितीत, ढठअख या डिऍक्टिव्हेट सिमला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याच्या योजनेवर काम करत आहे.

२०२४ पर्यंत भारतात १.१९ अब्ज पेक्षा जास्त दूरसंचार कनेक्शन असतील. तसेच मोबाईल नंबरची मागणी सातत्याने वाढत आहे. यामुळेच ट्रायने एक नवीन नंबर सीरीज प्रस्तावित केली आहे, ज्यामुळे मोबाइल क्रमांक सिस्टिममध्ये सुधारणा करता येईल.

ट्राय न वापरलेले सिम वापरण्याच्या योजनेवरही काम करत आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही दोन किंवा अधिक सिम जारी केले असतील आणि ते सिम दीर्घकाळ वापरत नसाल, तर अशा सिमला काळ्या यादीत टाकण्याची तयारी आहे, जेणेकरून तो सिम क्रमांक दुसर्‍याला दिला जाऊ शकतो.


Back to top button
Don`t copy text!