अनुप शहांनी स्वत:च्या तोंडाला लगाम लावावा : प्रीतसिंह खानविलकर; प्रसिद्धीच्या मोहापायी श्रीमंत रामराजेंवर बेछूट आरोप

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. 18 ऑक्टोबर 2024 | फलटण | माजी नगरसेवक अनुप शहा हे प्रसिद्धीच्या मोहापायी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. अनुप शहांनी खोटे आरोप करणे थांबवावे. त्यांनी वेळीच स्वत:च्या तोंडाला लगाम लावावा नाहीतर राजे गट शांत बसणार नाही; असा इशारा राजे गटाचे कट्टर समर्थक प्रितसिंह खानविलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिला आहे.

माजी नगरसेवक अनुप शहा यांनी काल पत्रकार परिषद घेवून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उध्वस्त करण्यासाठी राजे गटाकडून आगवणेंचा वापर केला जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे तीव्र शब्दात खंडन करत प्रितसिंह खानविलकर यांनी “आमच्या नेतृत्त्वावर आरोप करण्यापूर्वी त्यांनी आधी स्वत:ची पात्रता तपासावी आणि भान ठेवून बोलावे” असा इशाराही प्रितसिंह खानविलकर यांनी शहा यांना दिला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!