उमेद अभियानातील 10 हजार महिला काढणार मूक मोर्चा ; बाह्य संस्थेकडे वर्गच्या हालचाली : मूक मोर्चातून शासनाचा निषेध नोंदविणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, सातारा, दि.११: उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱयांची फेरनियुक्ती थांबविणे आणि अभियान बाह्य संस्थेकडे वर्गच्या हालचाली सुरू झाल्याने 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग खडतर झाला आहे. त्यामुळे सातारा जिह्यातील सुमारे 10 हजार महिला सोमवारी रस्त्यावर उतरून मूक मोचातून शासनाचा निषेध नोंदविणार आहेत. 

याबाबत संबंधितांनी दिलेली माहिती अशी की, महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सूरू आहेत. या अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. 

शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून, संस्था मोडकळीस येण्याची भीती आहे. संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू रहावे व बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये, या मागणीसाठी राज्यातील 10 लाख महिलांनी एल्गार पुकारला आहे. सोमवार दि. 12 ऑक्टोबरला राज्यात मूकमोर्चा काढून शासनास जाब विचारणार आहेत. 

सातारा जिह्यातही सोमवारी मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहे. यामध्ये जिह्यातील 10 हजार महिला सहभागी होतील असे नियोजन आहे. त्यामुळे महिलांनी अभियानाला वाचविण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला आहे. यासाठी राज्यभर मूकमोर्चा काढून शासनाने लक्ष वेधले जाणार आहे. असे सांगण्यात आले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!