आगामी काळात चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत: एंजेल ब्रोकिंग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ११ जुलै २०२१ । मुंबई । आंतरराष्ट्रीय बाजारातील चांदीच्या किंमतींत जून २०२१ मध्ये प्रचंड अस्थिरता दिसून आली. चांदी २८.५४ डॉलर प्रति औस एवढ्या उच्चांकावर ते २५.५२ डॉलर प्रति औस एवढ्या नीचांकावर स्थिरावली. तर एमसीएक्सवर सिल्व्हर फ्युचर्सनी ७३५८२ रुपये प्रति किलोच्या उच्चांकावर आणि ६६६२८ रुपये प्रति किलो एवढ्या निचांकी स्थानावर व्यापार केला.

१ जून ते २ जुलै २०२१ या कालावधीत चांदीच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात ५.७ टक्क्यांनी आणि एमसीएक्स फ्युचर्सवर ४.३३ टक्क्यांनी घसरल्या. अमेरिकेच्या कामगार बाजारात दमदार सुधारणा दिसून आली, डॉलर मजबूत झाला, वाढती महागाई आदी कारणांमुळे चांदीच्या दरांत गेल्या काही दिवसांत प्रॉफिट बुकिंग झाल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.

अमेरिकेतील कामगार बाजारातील आशावाद, पेंट अप मागणीमुळे तेलाच्या दरांतील वाढ, जगभरातील लसीकरणाचा वेग हे सर्व घटक चांदीच्या अस्थिरतेसाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहन क्षेत्रातून वाढती मागणी, जागतिक स्तरावर कोव्हिड संसर्गाची वाढती संख्या, मध्यवर्ती बँकांनी तरलतेला दिलेले प्रोत्साहन या सर्वांमुळे मासिक स्तरावर चांदीच्या दरात वाढ होण्याचे संकेत असल्याचे श्री माल्या यांनी सांगितले.

धातूच्या किंमतीतील अस्थिरता ही ट्रेडर्ससाठी चांगली असते. किंमतीच्या चढ-उतारांचा फायदा घेता येतो. एमसीएक्स फ्युचर्सवर (सीएमपी:रुपये.७०५००/kg) ७३००० रुपये प्रति किलो या गतीवरून चांगल्या शक्यता दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारात (सीएमपी:डॉलर२६.६/०z), डॉलर २८ हा आकडा मासिकदृष्ट्या आणखी सकारात्मक दिसतो. चांदीवर तेजी असल्याचे आम्ही मानतो, घसरणीवर खरेदी करणे हेच करड्या धातूतील स्पष्ट धोरण आहे.

करड्या धातूची उजळ बाजू: सिल्व्हर इन्स्टिट्यूटद्वारे १० फेब्रुवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेल्या विश्लेषणानुसार, चांदीचा औद्योगिक वापर आणि प्रत्यक्ष चांदीतील गुंतवणुकीमुळे २०२१ मध्ये चांदीची मागणी ६ वर्षातील उच्चांकी म्हणजेच १.०२५ अब्ज औसांवर पोहोचली. चांदीचे नाणे आणि बार खरेदी ही प्रत्यक्ष गुंतवणूक समजली जाते. त्यातील ६ वर्षातील वृद्धी २०२१ मध्ये २५७ दशलक्ष औसांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. कारण गुंतवणूकदार अजूनही त्यांच्या होल्डिंग्समध्ये चांदीचा समावेश करत आहेत.

२०२१ मध्ये आधीच, एक्सचेंज ट्रेडेड उत्पादनांमधील होल्डिंग ३ फेब्रुवारी रोजी विक्रमी पातळीवर म्हणजेच १.१८ अब्ज औसांवर पोहोचली. औद्योगिक मागणी २०२१ मध्ये ४ वर्षांतील उच्चांकावर म्हणजेच २०२० च्या आकडेवारीत ९ टक्क्यांची वृद्धी होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. चांदीच्या दागिन्यांतील जागतिक मागणी १७४ दशलक्ष औंसपर्यंत पुन्हा उसळी घेईल असा अंदाज आहे, मात्र ही आकडेवारी कोव्हिड पूर्वीच्या पातळीखालीच राहील. वाहन बाजारात चांदीचा वापरही २०२१ मध्ये प्रचंड वाढेल. तो ६० दशलक्ष औंसपर्यंत पोहोचेल. वाहनांच्या वाढत्या विद्युतीकरणाचा फायदा चांदीला होईल.

तसेच, २०२० मधील जागतिक चांदीच्या पुरवठ्यातील ३४% भाग इलेक्ट्रॉनिक वाहनांमध्ये वापरला गेला. हा संपूर्ण सेगमेंट वाढत राहणार असल्याचा अंदाज आहे. तसेच प्रिंटेड आणि फ्लेक्झीबल इलेक्ट्रॉनिक्समधील एका सेक्टरमध्येही २०२१ मध्ये ४८ दशलक्ष औंस वरून ५४ टक्क्यांनी वाढून २०३० मध्ये ती ७४ दशलक्ष औंसपर्यंत वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!