
दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२३ | फलटण |
डेरवण येथे झालेल्या युथ गेम्स २०२३ या धावण्याच्या स्पर्धेमध्ये राजाळे, तालुका फलटण येथील कुमारी शुभ्रा निंबाळकर हिने ३० मीटर धावणे स्पर्धेत ५.९ सेकंद ही वेळ नोंदवून दहा वर्षे वयोगटात तृतीय क्रमांक मिळविला. ती सिल्वर मेडलची मानकरी ठरली. शुभ्रा सिल्वर मेडल मिळविल्याने युथ गेम्समध्ये राजाळे गावचे नाव उंचावले आहे.
शुभ्रा निंबाळकर हिच्या यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणार्या कोच यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. राजाळे ग्रामस्थांनीही तिचे अभिनंदन केले आहे.