श्रुती कुलकर्णीची लंडन युनिव्हर्सिटीत ‘एम.एस्सी. युजर एक्सपिरियन्स डिझाईन’ अभ्यासक्रमासाठी निवड


दैनिक स्थैर्य | दि. ४ सप्टेंबर २०२४ | फलटण |
लॉ कॉलेज, फलटणचे हेडक्लार्क अमोल कुलकर्णी यांची कन्या कु. श्रुती कुलकर्णी हिची किंगस्टन युनिव्हर्सिटी, लंडन येथील ‘एम.एस्सी. युजर एक्सपिरियन्स डिझाईन’ या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाकरिता निवड झाली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रतीवर्षी फक्त ४० विद्यार्थी निवडले जातात. त्यामध्ये कु. श्रुतीची निवड झाली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे. याप्रसंगी फलटण नगरपरिषदेचे माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, बुरुंगले सर, खेडकर, मुकूंदराव रणवरे, अमोल कुलकर्णी हे उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!