फलटण जैन सोशल ग्रुपचे श्रीपाल जैन यांचा राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट सचिव’ पुरस्काराने सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३० मार्च २०२३ | फलटण |
जैन सोशल ग्रुप फलटणचे सचिव श्रीपाल जैन यांना जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशनकडून राष्ट्रीय स्तरावरील ‘बेस्ट सचिव’ पुरस्कार देऊन मुंबई येथे झालेल्या अ‍ॅवॉर्ड सेरेमनी कार्यक्रमात गौरवण्यात आले.

जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशनचे राष्टीय अध्यक्ष ललित शहा व भारतीय मायनॉरिटी कमिशन नवी दिल्लीचे सदस्य सुनीलजी सिंगी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन श्रीपाल जैन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नियोजित प्रेसिडेंट अमितजी झवेरी, इलेक्टेड प्रेसिडेंट बिरेनजी शहा, कोल्हापूर झोन को-ऑर्डिनेटर सुनित परिख, जैन सोशल ग्रुप फलटणचे अध्यक्ष डॉ.सूर्यकांत दोशी उपस्थित होते.

बेस्ट सचिव पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून श्रीपाल जैन यांचे अभिनंदन करण्यात आले. जैन सोशल ग्रुप्स इंटरनॅशनल फेडरेशनचा पुरस्कार प्रथमच फलटण ग्रुपला मिळाला आहे.

सत्काराबद्दल बोलताना श्रीपाल जैन यांनी फलटण जैन सोशल ग्रुपचे सर्व पदाधिकारी, रिजन व झोन पदाधिकारी यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे दोन वर्षात अनेक सामाजिक कामे करू शकलो, त्यामुळेच बेस्ट सचिव पुरस्कार मिळाल्याचे नमूद केले.


Back to top button
Don`t copy text!