जैन सोशल ग्रुप फलटणच्या अध्यक्षपदी श्रीपाल जैन यांची निवड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. 16 एप्रिल 2025 | फलटण | येथील जैन सोशल ग्रुपच्या कार्य कालावधीच्या 2025-2027 या काळासाठी श्रीपाल जैन यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी, सचिव पदी सौ. निना कोठारी, तर खजिनदार पदी राजेश शहा यांची निवड करण्यात आली आहे. तसेच, जैन सोशल ग्रुप अंतर्गत संगिनी फोरम व युवा फोरमसह तिन्ही ग्रुपच्या कार्यकारणीची निवड ही झाली आहे.

या फोरमच्या अध्यक्षपदी सौ. मनिषा व्होरा, सचिव पदी सौ. वृषाली गांधी, तर खजिनदार पदी सौ. विनयश्री दोशी यांची निवड झाली आहे.

अध्यक्षपदी पुनीत दोशी, सचिव पदी सिद्धांत शहा, आणि खजिनदार पदी मीहीर गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशनच्या अध्यक्ष बिरेनभाई शहा, महाराष्ट्र रीजन अध्यक्ष दिलीप मेहता, सचिव सचिन शहा, उपाध्यक्ष सचिन दोशी, फलटण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुपच्या माजी अध्यक्षा सौ. सविता दोशी, राजेंद्र कोठारी, डॉ. सूर्यकांत दोशी, माजी सचिव प्रीतम शहा, संगिनी फोरम संस्थापक अध्यक्षा सौ. स्मिता शहा आणि सर्व पदाधिकारी, संचालक व सदस्यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

दि. 22 एप्रिल रोजी जैन सोशल ग्रुप परिवारात नवीन कार्यकारिणीचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.

Back to top button
Don`t copy text!