दैनिक स्थैर्य | दि. १४ एप्रिल २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय पर्व अभियानांतर्गत सामाजिक समता कार्यक्रम आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत देशाच्या जडणघडणीतील योगदान व घेतलेले कठोर परिश्रम याबाबत प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर तरटे यांनी केले. सदरील कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यी मोठया संख्येने उपस्थित होते.