
दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महात्मा फुलेनगर कामगार वसाहत, फलटण येथे दि. १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ‘जय खोडियार माँ’ चे पूजन करून पुष्पहार अर्पण केला व आरती करण्यात आली.
यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी काठियावाडी मेहतर रूखी समाजाला नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी समाजाच्या वतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा पुष्पहार, शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास नवरात्र उत्सव समितीचे मयुर मारूडा, अध्यक्ष निखिल वाळा, उपाध्यक्ष अभय वाळा, कार्याध्यक्ष सूरज मारुडा, सल्लागार प्रणित डांगे, लखन डांगे हे उपस्थित होते.
यावेळी समाजाचे कार्याध्यक्ष राजू मारूडा, देवदास वाळा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, खजिनदार मनोज मारूडा, सचिव भाऊ कापसे, बापूसाहेब देशमुख, संदीपभाऊ चोरमले, उद्योगपती आरपीआयचे संजय निकाळजे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सतीश अहिवळे, अध्यक्ष, फलटण तालुका समाजाचे पदाधिकारी, नवरात्र उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होता.