स्थैर्य, गोखळी दि.०६ : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथील कोरोना विलगीकरण कक्षातील ७ कोरोनामुक्त रूग्णांना सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाडं देऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
गोखळी ग्रामपंचायतीच्या वतीने लोकसहभागातून तरूणांनी सुरू केलेल्या कोरोना विलगीकरण कक्षास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भेट देऊन कामकाजाबाबत आढावा घेऊन या ठिकाणी उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांशी संवाद साधला.
आज अखेर या विलगीकरण कक्षात ७३ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ५० कोरोनामुक्त रुग्णांना निरोप देण्यात आला तर दोन रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. सध्या २१ रुग्ण दाखल आहेत अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते राधेश्याम जाधव यांनी दिली.
यावेळी गोखळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मनोज गावडे, खटकेवस्तीचे सरपंच बापूराव गावडे, विश्वासदादा गावडे, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक संतोष खटके, माजी सरपंच नंदकुमार गावडे, अजित गावडे, अक्षय रोकडे, योगेश गावडे पाटील, प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष सागर गावडे पाटील, उपसरपंच डॉ.अमित गावडे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर घाडगे, अभिजित जगताप, सुनील बापू मदने, योगेश भागवत , पप्पू जगताप, काळेश्वर ढोबळे आदी उपस्थित होते.