दैनिक स्थैर्य | दि. ०७ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
वाठार निंबाळकर येथे रविवारी शेतकरी मेळाव्यात बोलताना आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेले वक्तव्य कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने मुळीच नव्हते, त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन सकल नाभिक समाज बांधव संघटनेच्या वतीने एका पोस्टद्वारे केले आहे.
या पोस्टमध्ये संघटनेने म्हटले आहे की, आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाभिक समाजाविषयी सतत आपुलकी व प्रेमाची भावना जपली असून त्यातून फलटण – सातारा मार्गावरील चौकाला शूरवीर जीवा महाले यांचे नाव देऊन त्यांच्याविषयी आदराची भावना व्यक्त करण्याची भूमिका ठेवली आहे. या समाजाच्या विविध प्रश्नांमध्ये त्यांनी सतत लक्ष घातले आहे.