दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । फलटण । बी. डी. डी. चाळ, मुंबई प्रकरणी गुहनिर्माण मंत्री ना. जिंतेद्र आव्हाड यांना पत्र व समस्याग्रस्तांचे निवेदन पाठवून या प्रश्नात लक्ष घालुन समस्या निवारणाची विनंती महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली आहे.
मुंबईतील बी. डी. डी. चाळीचा पुनर्विकास प्रकल्प गेली २० वर्षे रखडला असून १ वर्षापूर्वी या प्रकल्पाचे भूमीपूजन खा. शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, गुहनिर्माण मंत्री जिंतेद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत संपन्न झाले असल्याचे निदर्शनास आणून देत त्याबाबत स्वतः लक्ष घालुन संबंधीतांना न्याय देण्याची विनंती नायगाव, मुंबई विभागातील मुद्रा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. ज्योती मनोज माने व सातारा जिल्हा विकास समिती (ट्रस्ट) मुंबई यांच्यावतीने निवेदनाद्वारे विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना केली होती.
जाचक अटी व त्रुटी, समस्यामुळे हा प्रकल्प रखडला असून बी. डी. डी. चाळ रहिवासी संभ्रमात असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची विधान भवनात भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले, त्यावेळी त्यांनी बी. डी. डी. चाळ समस्यांबाबत चर्चा करुन गुहनिर्माण जिंतेद्र आव्हाड यांना देण्यासाठी पत्र दिले, तसेच गुहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन संबंधीतांना दिले आहे.
मुद्रा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. ज्योती मनोज माने यांनी त्यांचे आभार मानले. त्यावेळी सातारा जिल्हा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष मनोज माने, शिशू विकास मंडळाचे सदस्य प्रशांत माने, अभिजीत सावंत उपस्थित होते.