“समस्या “ही कापसाने भरलेल्या
पोत्यासारखी असते,
जे फक्त त्या पोत्याकडे बघतात
यांना ती जड वाटते
पण जे ती हाताळतात त्यांनाच
खरे वास्तव कळते.त्यातून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग असतात.नुसता विचार करुन समस्या सुटत नसते.त्यासाठी समस्येच्या मुळाशी गेले की त्याची व्यापती कळते .
समस्यातून मानवी भावभावनाचे व वृत्तीचे कांगोरे ध्यानात येतात.समस्या ही निर्माण करण्यात आली आहे का?नुसता फार्स आहे.हे कळलं की गुंता सोडायला मोकळे.
एक मात्र खरे आहे की,समस्याशिवाय जीवनात रंगतच नाही.जीवन जगताना सरळ मार्गी आचरण असावे.पण अधूनमधून समस्या निर्माण झाल्यास आपण जाग्यावर येतो.जगण्याचे भान येते.एकमेकांच्या आधाराची गरज भासते.आपले तुपले कळतात.शेवटी काय समस्यातून सकारात्मकता वाढीस लागल्यास जीवन विकास कुंठीत होणार नाही.समस्या सोडविणे,सोडून देणे महत्त्वाचे म्हणजे मला त्यातून काय शिकायला भेटले हे पाहणे इष्ट होईल .
समज हेच समस्या निवारण
आपलाच समजधारक प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१