प. पु. उपळेकर मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी श्रीमंत रामराजे बिनविरोध


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । फलटण । प. पु. उपळेकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टच्या अध्यक्ष पदी विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध रानडे, सचिव पदी माजी नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर तर कोषाध्यक्ष पदी हेमंत रानडे यांची निवड करण्यात आलेली आहे.

प. पु. उपळेकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टची निवडणूक नुकतीच बिनविरोध संपन्न झाली.

यावेळी विश्वस्त मंडळात प्रवीण रणवरे, अनिल तेली, बाळकृष्ण कणसे, महेश बरसावडे व शंतनु रूद्रभटे यांची वर्णी लागली आहे.

प. पु. उपळेकर महाराज समाधी मंदिर ट्रस्टची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी नुतन पदाधिकाऱ्यांचे सर्वांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!