
दैनिक स्थैर्य | दि. १७ मार्च २०२५ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे आता घरगुती साधने दुरुस्तीचा डिप्लोमाला ॲडमिशन घेणार, असा उपहासात्मक टोला त्यांनी पाणी प्रश्नावर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लगावला आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात सुरू असलेल्या पाणी प्रश्नावर WhatsApp स्टेटस द्वारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांना उपहासात्मक टोला लगावला आहे.
यामध्ये श्रीमंत रामराजे म्हणत आहेत की; पाणी प्रश्नाला पीएचडी लागत नसून घरगुती साधने दुरुस्तीचा डिप्लोमा लागतो, प्रवेश घेत आहे, अशा आशयाचे WhatsApp स्टेटस शेअर केले आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी शेअर केलेल्या व्हाट्सअप स्टेटस मुळे तालुक्यामध्ये विविध चर्चांना उधाण आलेले आहे.