स्थैर्य, फलटण दि. 10 : महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. त्यामुळे गेले काही आठवडे विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे मुंबईत असून या कालावधीत त्यांना फलटण व सातारला येणे शक्य झाले नाही. तथापी, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून 12 मार्च 2021 पासून नियमित फलटण व सातारा दौरा आपल्या सेवेसाठी सुरू होईल, असा व्हाटस्अॅप स्टेटस जनता व कार्यकर्त्यांना उद्देशून ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पोस्ट केलेला आहे.
सध्या धावपळीच्या जगामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना नेत्यांकडून अचूक माहिती मिळण्यासाठी सोशल मीडिया हा पर्यायच योग्य ठरत आहे. विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कायमच तंत्रज्ञानासोबत अद्ययावत रहात असतात. त्यातून एखादे आवाहन, सूचना, मत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांपर्यंत सहजगतीने पोहचवणे शक्य होते. त्याचा फायदा नक्कीच कार्यकर्त्यांना होताना दिसत असतो.
सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांशी नेते मंडळींची अनोखी नाळ जुळलेली असते. त्यामुळे राज्यपातळीवरील जबाबदारी पार पाडत असताना जरी आपल्या जिल्ह्यापासून दूर रहावे लागले तरी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील जनतेशी व कार्यकर्त्यांशी कायम कनेक्ट रहाणे सोशल मिडीयामुळे नेते मंडळींना सहजगत्या शक्य होत असल्याचे यातून दिसून येत आहे.