दैनिक स्थैर्य | दि. ०५ फेब्रुवारी २०२५ | फलटण | सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी व गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट येथे विविध तपास यंत्रणाच्या धाड पडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या सर्व प्रकारावर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार यांनी कृपया “गर्दी करू नका, खात्याला काम करू द्या; काळजी नसावी” अशा आशियाचे सूचक विधान व्हाट्सअप स्टेटस द्वारे केलेले आहे.
आज सकाळी ६ वाजल्यापासून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी विविध तपास यंत्रणांचे धाड पडली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असताना त्यानंतर कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी गर्दी करू लागलेले होते. या सर्व आशयावर विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्हाट्सअप स्टेटस द्वारे सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेले आहे.