दैनिक स्थैर्य | दि. 11 मे 2023 | फलटण | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. यामध्ये विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाची एक हाती सत्ता बाजार समितीवर आलेली आहे. आज झालेल्या निवडीमध्ये बाजार समितीच्या सभापती पदी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तर उपसभापतीपदी भगवान होळकर यांची एकमताने पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे.
आज, दि. 11 मे रोजी सभापती व उपसभापती निवडीसाठी सहाय्यक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील धायगुडे यांनी नूतन संचालक मंडळाची सर्वसाधारण सभेचे आयोजन केलेले होते. यामध्ये सभापती व उपसभापती पदांची एकमताने निवड करण्यात आली. प्रशासक सुनील धायगुडे यांनी बाजार समितीच्या कार्यभार श्रीमंत रघुनाथराजे यांच्याकडे सुपूर्द केला.
बाजार समितीच्या उपसभापती पदी रावडी येथील भगवान होळकर यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये भगवान होळकर हे सोसायटी सर्वसाधारण मतदारसंघांमधून निवडून आलेले उमेदवार आहेत. गतवेळी सुद्धा भगवान होळकर हे उपसभापती होते पुन्हा त्यांच्याच गळ्यात उपसभापती पदाची माळ पडली आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाने फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीवर आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा स्थापन केलेले आहे. त्यामध्ये विरोधकांना एकाही जागेवर राजे गटाने यश मिळू दिले नाही. मतदारांनी राजे गटालाच बाजार समितीवर पुन्हा निवडून दिले आहे.
काही वर्षांपूर्वी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती ही मुख्य प्रवाहात नव्हती परंतु श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायापालट करत बाजार समितीला प्रमुख प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी बाजार समितीचे उत्पन्न जे काही लाखात होते ते आता कोट्यावधी रुपयांचे उलाढाल करण्याएवढे तयार केलेले आहे. त्यामुळे बाजार समितीवर राजे गटाची सत्ता पुन्हा एकदा स्थापन झालेली आहे. आगामी काळामध्ये बाजार समितीच्या कायापालट राज्यात नव्हे तर देशात एक आदर्श बाजार समिती म्हणून फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपास येईल, अशी खात्री सर्वच मतदारांना आहे.
– तर असे असेल बाजार समितीचे नूतन संचालक मंडळ –
श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर – सभापती
भगवान दादासो होळकर – उपसभापती
संचालक – अक्षय गायकवाड, निलेश कापसे, तुळशीदास शिंदे, संतोष जगताप, चेतन सुभाष शिंदे, दीपक गौंड, शंभूराज विनायकराव पाटील, शरद लक्ष्मण लोखंडे, ज्ञानदेव बाबासो गावडे, भीमराव पोपटराव खताळ, सौ. सुनीता चंद्रकांत रणवरे, सौ. जयश्री गणपत सस्ते, किरण सयाजी शिंदे, चांगदेव कृष्णा खरात, संजय हरिभाऊ कदम, समर दिलीप जाधव.