श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक शाळेचा स्पर्धा परीक्षेत नावलौकिक; नवोदय विद्यालयासाठी 2 विद्यार्थ्यांची निवड


दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२१ । फलटण । केंद्रीय विद्यालयात तर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश स्पर्धा परीक्षेत येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमंत निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतून विद्यार्थिनी कु. भार्गवी नितीन चांडोले (इयत्ता पाचवी) आणि चि.रुद्रप्रताप जितेंद्र साळुंखे या दोघांची निवड झाली.

तसेच मंथन स्पर्धा परीक्षा 2019-2020 मधील शाळेतील 24 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे.

या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, अधीक्षक श्रीकांत फडतरे तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली जाधव, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!