श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर विद्यानगर फलटण प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत निर्मला देवी प्राथमिक विद्यामंदिर या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच दिनांक 30 /12 /2022 रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा. श्री संजय गायकवाड साहेब होते तर अध्यक्षस्थानी गव्हर्निंग कौन्सिल सदस्य माननीय श्री भोजराज नाईक निंबाळकर होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर बक्षीस वितरण, हस्तलिखित व यशोगाथा प्रकाशन झाले. शैक्षणिक उपक्रमांचे पीपीटी द्वारे अहवाल वाचन मुख्याध्यापिका  जाधव मॅडम यांनी स्क्रीनवर केले. यावेळी गव्हर्निंग कौन्सिल उपाध्यक्ष अशोक दोशी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य श्री रमणलाल दोशी,  रणजीत निंबाळकर, शिरीष भोसले, श्री शिवाजीराव घोरपडे, सौ. नूतन शिंदे  प्रशासन अधिकारी श्री. निकम सर  तसेच मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. गंगवणे सर ,शेती शाळा हायस्कूलचे प्राचार्य श्री. कोळेकर सर. सर्व बालक व प्राथमिक विद्यामंदिर चे मुख्याध्यापक ,निमंत्रित सदस्या रणवरे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.लोंढे मॅडम हजर होत्या. प्रमुख अतिथींचे स्वागत शाळेच्या व्हाईस चेअरमन सौ वसुंधरा नाईक निंबाळकर यांनी केले व सर्व मान्यवरांचे स्वागत सौ. जाधव मॅडम यांनी केले यावेळी 23 गाण्यांवर विविध कलाविष्कार झाले. यामध्ये  विद्यार्थ्यांच्या ड्रेपरीने आणि डान्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले .प्रेक्षकांची तुफान गर्दी न भूतो अशी होती . शाळेच्या सर्व पालकांनी उत्तम प्रकारे शांततेचे सहकार्य केले .सर्व मान्यवर पालक शिक्षक विद्यार्थी या कार्यक्रमाच्या सादरीकरणाने आनंदित झाले व त्याचबरोबर नवीन वर्षाचे स्वागतही करण्यात आले .

सूत्रसंचालन स्नेहल जगताप रूपाली कदम अर्पिता बाबर श्री. निंबाळकर सर ,चव्हाण सर या शिक्षकांनी केले या शाळेने राबवलेले उपक्रम इतर शाळांसाठी प्रेरणादायी असल्याचे कार्यक्रमाचे अतिथी व अध्यक्ष यांनी मनोगतात  व्यक्त करत शुभेच्छा देऊन शालेय व्यवस्थापनाचे कौतुक केले.


Back to top button
Don`t copy text!