
दैनिक स्थैर्य । दि. ०४ जानेवारी २०२३ । फलटण । फलटण शहरास फलटण शहराच्या बाजूला असणाऱ्या परिसरा मधून एअरटेल कंपनीची रेंज गेले दोन तासानेहून अधिक गायब झाली असल्याने एअरटेलच्या ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एअरटेल कडून बऱ्याच वेळा रेंज जाण्याचे प्रकार हे झालेले आहेत त्यामुळे महत्त्वाचे काम असेल व फक्त एअरटेल चे सिम कार्ड असेल तर ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.