खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतली श्रीमंत संजीवराजेंची भेट


दैनिक स्थैर्य । दि. ०८ नोव्हेंबर २०२१ । फलटण । भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची आज दि. ०८ नोव्हेंबर रोजी फलटण येथील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘‘सरोज – व्हीला‘‘ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये सुमारे तासभर विविध विषयांवर चर्चा झाली. सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीचे घमासान सुरू आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतर लगेचच श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!