श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025: फलटणमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०२ जानेवारी २०२५ | फलटण | श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण द्वारा आयोजित श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शन 2025 चे अनौपचारिक उदघाटन श्रीमंत भोजराज नाईक निंबाळकर, चेअरमन इंटरनॅशनल जाईंट ग्रुप, फलटण यांच्या हस्ते उत्साहत संपन्न झाले. हे प्रदर्शन 2 जानेवारी ते 6 जानेवारी 2025 पर्यंत चालू राहणार आहे.

या प्रसंगी गव्हर्निंग कोन्सिलचे व्हाइस चेअरमन रमणलाल दोशी, महाविद्यालयीन समितीचे व्हाइस चेअरमन शरदराव रणवरे, गव्हर्निंग कोन्सिलचे सदस्य शिरीष भोसले, सी. डी. पाटील, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, प्रशासन अधिकारी, फलटण एज्युकेशन सोसायटी अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविदया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण, कुंडलिक नाळे यांची उपस्थिती होती.

सदर कृषी प्रदर्शनासाठी मालोजीराजे शेती विद्यालयाचे दक्षिण बाजूस असलेल्या भव्य पटांगणात प्रदर्शनामधील स्टॉल ची मांडणी केली होती. या प्रदर्शनामध्ये 181 स्टॉल उभारले गेले आहेत, ज्यापैकी आज रोजी 166 स्टॉल बुक झाले आहेत. प्रदर्शनात नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून शेतकऱ्यांना अमूल्य माहिती दिली. ट्रॅक्टरचे स्टॉल, शेतीची विविध औजारे, बी बियाणे, विविध प्रकारची खते कीटकनाशके, बुराशीनाशके, ड्रोन तंत्रज्ञान, जैविक खते, इतर व्यावसायिक उत्पादने, प्रक्रियायुक्त पदार्थ खाण्याचे विविध पकवान यांचे स्टॉल सहभागी झाले.

आजच्या कृषि प्रदर्शनातील प्रथम विक्री अशोक लेलँड या कंपनीचा श्री गजानन ऑटोमोबाईल या अधिकृत विक्रेत्याकडून छोटा हत्ती अंदरुडचे श्री. अजिनाथ कर्णे यांना करण्यात आली. स्वराज ट्रॅक्टर 744 xt या मॉडेलच्या 4 ट्रॅक्टरची मागणी करण्यात आली व जॉन डिअर कंपनीच्या ट्रॅक्टरची मागणी नोंदवण्यात आली. तसेच 4 स्कूटर व 2 मोटरगाड्यांची विक्री झाली. कृषी विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कार प्राप्त फळांचे गांव धुमाळवाडीची मांडणी, कृषी विभागाच्या योजना व उसाचे सुपरकेन नर्सरी तंत्रज्ञान प्रमुख आकर्षण ठरले.

हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना, उद्योजकांना व व्यवसाईकांना अमूल्य माहिती प्रदान करण्यात मदतील आहे. प्रदर्शन आयोजन कमिटीचे बहुमोल सहकार्य या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लाभले. सर्व शेतकरी बांधवांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!