कृषि प्रदर्शनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : २० हजारांची भेट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०५ जानेवारी २०२५ | फलटण | श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण द्वारे आयोजित केलेल्या श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन २०२५ च्या तिसऱ्या दिवशी २० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली, या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हे प्रदर्शन २ जानेवारी ते ६ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटिल व अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी विधान परिषद सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे होते. तिसऱ्या दिवशी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलसचिव डॉ. नितिन दाणवले यांनीही प्रदर्शनाला भेट दिली.

सदरील कृषि प्रदर्शनामध्ये विविध कृषि संबंधित कंपन्या, शेती व्यवसायाला लागणाऱ्या कृषि निविष्ठा, शेती यांत्रिकीकरण, कृषि विषयक विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला व त्याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. एपल बोर, ऊस, पपई, संत्रा, भाजीपाला, डाळ, तांदूळ इ. संपूर्ण शेतमाल विकला गेला. तसेच, तालुक्यातील महिला बचत गटांनी गृहोपयोगी व खाद्यपदार्थ, पापड, लोणचे, मशरूम, गुळपट्टी इ. पदार्थांचे स्टॉल लावून विक्री केली.

या कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण म्हणून श्री. अजिनाथ पवार, मौजे वाघोशी, यांचा चार पायाचा कोंबडा, श्री. मनोज कदम, मौजे गिरवी यांचा खिलार जातीचा काझळ बैलजोडी, श्री. धीरज ढेंबरे, मौजे वडजल यांचा खिलार जातीचा चंदर बैल, महाराष्ट्र शासन कृषि विभागाचे फळाचे गाव धुमाळवाडी आकर्षण, उमेद अभियानाचे विविध स्टॉल, पशुसंवर्धन विभाग आणि पाणी फौंडेशनचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले. विविध कंपन्यांचे ट्रॅक्टर, शेती यंत्र व अवजारे, मोटार गाड्या, शेती तंत्र यांची बहुसंख्य प्रमाणात शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांनी विक्री करण्यात आली.

तालुक्यातील प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत फलटण तालुक्यातील व पंचक्रोशीतील बहुसंख्य ४०,००० ते ५०,००० शेतकऱ्यांनी कृषि प्रदर्शनाला भेट दिली.

श्रीमंत मालोजीराजे कृषि प्रदर्शन २०२५ ने शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, शेती संबंधित निविष्ठा आणि विक्री संधी प्रदान करून एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. या प्रदर्शनाने शेती क्षेत्रातील प्रगती व सुधारणेच्या दिशेने एक महत्त्वाचा पाऊल म्हणून पाहिले जाईल.


Back to top button
Don`t copy text!