म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी यात्रा रद्द; खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी केले स्पष्ट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, म्हसवड, दि.११ : म्हसवड येथील श्री सिध्दनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानची देवदिवाळीस मंगळवारी (दि १५)भरणारी यात्रा करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे.यात्रा कालावधील म्हसवड शहर व मंदीर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. भाविकांनी रथ यात्रेस येऊ नये असे आवाहन माण-खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी केले आहे.

यात्रे संदर्भात म्हसवड पोलिस ठाणे आवारात दुपारी घेण्यात आलेल्या बैठकीत शैलेश सुर्यवंशी यांनी माहिती दिली.यावेळी दहिवडीचे पोलिस उपअधिक्षक डॉ देशमुख,माणच्या तहसिलदार बाई माने, रथाचे मानकरी अजितराव राजेमाने, विलासराव माने,नगराध्यक्ष तुषार विरकर,उपनगराध्यक्षा स्नेहल सुर्यवंशी, मुख्याधिकारी डॉ.सचिन माने,मंदिराचे सालकरी व सिध्दनाथ ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त,सचिव मानकरी उपस्थित होते

राज्यात,जिल्ह्यात सध्या करोनाची साथ सुरु असुन शासनाने ३१ डिसेंबर अखेर काही शर्ती व अटीवर लॉकडाऊन जाहीर केलेला आहे.

म्हसवड येथेही केरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत.यामुळे यात्रेकरु व येथील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षतेच्या दृषिटीने येथील श्री सिध्दनाथ देवस्थानची यात्रा भरवलीच जाणार नाही व शासनही यात्रेस परवानगी देणार नसल्याचे त्यांनी स्पस्ट केले.

यात्रेतील पारंपारिक रथ मिरवणूकीवरही बंदी घालण्यात आली असुन यात्रा मैदानात व्यावसाईकांनी दुकाने थाटू नयेत असे आवाहन करणयात आले. यात्रा कालावधीत म्हसवडकडे येणारे सर्व रस्ते सील करुन पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. भाविकांना मयात्रा व मंदीर परिसरात प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. शासनाच्या आदेशानुसार मंदीरातील धार्मिक कार्यक्रम पुजारी मंडळीच्या उपस्थित शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसारच धार्मिक विधी पार पाडवेत. 

या बैठकीत यात्रा कालावधीत परगावचे भाविक येऊ नयेत यासाठी शासन पातळीवर आवाहन करण्यात आले. यावेळी तहसीलदार बाई माने, अजितराव राजेमाने, दिलीप किर्तने, युवराज सुर्यवंशी, अकील काफी,पृथ्वीराज राजेमाने आदींनी चर्चेत भाग घेतला.

या बैठकीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी श्री सिध्दनाथ मंदीर,यात्रा परिसर व श्रीच्या रथास उपस्थितांनी भेटी देऊन पाहणी केली. 

सातारा जिल्ह्यात यात्रांचा हंगाम म्हसवड येथील यात्रेपासुनच सुरु होतो.म्हसवड येथील यात्रेस सुमारे पाच ते सहा लाख भाविकांची उपस्थिती असते.शासनाने यात्रा रद्द करून पुढील सर्व यात्रा होणार नसल्याचे स्पष्ट केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!