रामसाहेब निंबाळकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २७ डिसेंबर २०२४ | निंबळक | निंबळक श्री निमजाईदेवी एन्डॉमेंट ट्रस्टचे अध्यक्ष रामसाहेब उदयसिंह निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त निंबळक येथील शालेय विद्यार्थांना वही, पेन व खाऊवाटप करण्यात आले.

तसेच दि. २७ डिसेंबर २०२४ रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण क्रीडा व आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रामसाहेब निंबाळकर यांचा वाढदिवस गावातील सर्व ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!