बारामती मध्ये श्री पुष्टीपती विनायक जयंती उत्साहात साजरी


दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । बारामती । शहरातील विद्या हॊसिंग सोसायटी येथील श्री पुष्टीपती गणेश संस्थांच्या वतीने श्री पुष्टीपती विनायक जयंती साजरी करण्यात आली. या वेळी नगरसेविका शारदा मोकाशी, भाजपा सरचिटणीस अविनाश मोटे, श्रायबर डायनॅमिक्स डेअरी चे रिजनल मॅनेजर जितेंद्र जाधव,हेमंत चव्हाण,प्रदीप तोडकर,पियाजो व्हेइकल्स चे प्रसाद बोरणालकर ,बारामती बँक चे संचालक नामदेव तुपे,संस्थांनचे अध्यक्ष सुमित मांजरे ,हर्षवर्धन पाटील,माऊली जगताप,धनंजय धुमाळ,महेश ताटे, सुधीर मांजरे,आदी मान्यवर उपस्तीत होते.

श्री गणेश च्या अवतारा पैकी पुणे जिल्ह्यातील एकमेव श्री पुष्टीपती विनायक मंदिर असून २००७ साली मंदिराच्या स्थापने पासून ते २०२२ मधील वर्धापन दीना पर्यंत ज्यांनी विविध कार्यात योगदान दिले त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्री गणेश पूजन पुण्याहवाचनादी, श्री गणेश याग होमहवन, सार्वजनिक श्री गणेश अभिषेक, बलिदान पूर्णहुती, श्री गणेश जन्मोत्सव, पाळणा, महाआरती, महानेवेद्य, महाप्रसाद आदी कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.

वर्षभरात मंदिरातील विविध कार्यक्रम व नियोजन परिसरातील सर्व महिला पाहतात.धार्मिक सलोखा राहावा व या कार्यक्रमाच्या निमित्ताने विचारांची देवाण घेवाण होणे साठी आणि बारामती च्या धार्मिक वैभवात भर पडावी म्हणून कार्यक्रमाचे दरवर्षी आयोजन करत असल्याचे अध्यक्ष सुमित मांजरे यांनी सांगितले. सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर स्वागत प्रीती पाटील व सौ मांजरे यांनी केले तर आभार सौ पुष्पांजली हेमंत चव्हाण यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!