
स्थैर्य, फलटण, दि. २ नोव्हेंबर : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर येथून श्री क्षेत्र आळंदीकडे जाणाऱ्या श्री पांडुरंग परमात्मा पायी दिंडी पालखी रथ सोहळ्याचे शनिवारी, दि. ८ नोव्हेंबर रोजी फलटण शहरात आगमन होत आहे.
सकाळी ११ वाजता हा पालखी सोहळा येथील नाना पाटील चौकातील श्री संत सावता महाराज मंदिरात दर्शनासाठी येणार आहे. आषाढी वारीमध्ये ज्ञानेश्वर माऊली पंढरपूरला जातात, तर कार्तिकी वारीत पांडुरंग पंढरपूरवरून आळंदीला जातात, या परंपरेचा हा सोहळा एक भाग आहे.
तरी फलटण परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

