
दैनिक स्थैर्य । 18 मे 2025। बारामती। श्री महाकालेश्वर फाउंडेशन आयोजित धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (बुधवार 14 मे) विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
सुर्यनगरी येथे जयंतीनिमित्त मर्दानी खेळ, शिवकालीन वेशभूषा,व्याख्यान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्याख्याते प्रा. मनोज पाटील म्हणाले, संभाजी महाराजांचे शौर्य,धर्मिष्ठा व स्वराज्य प्रेम जगात कोणाकडे सुद्धा नाही हे त्यांच्या त्याग व बलिदान मधून दिसून येते.
बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक हनुमंत पाटील, अजितदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड, अभिनेत्री श्रद्धा शिंदे, गणेश बोरावके, अमोल तोरणे, निलेश खराडे, ऋषिकेश फाळके, धनंजय जमदाडे, गणेश पवार, अभिराज टेकवडे, चेतन घाडगे, सुजित चव्हाण, ओंकार पवार, गणेश चव्हाण, दीपक गायकवाड, विशाल चव्हाण, नितीन खोत, सागर टिंगरे, शुभम जाधव, प्रेम लोखंडे, अक्षय, प्रदीप गायकवाड, अक्षय माने, हर्षल तोरणे, अभि जाधव, आविष्कार ढवळे, कार्तिक मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती संभाजी महाराज यांचे चरित्र कळावे व त्याग, बलिदान यांचे स्मरण युवा व नवीन पिढीला व्हावे त्यांचा आदर्श घ्यावा म्हणून या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याचे श्री महाकाळेश्वर युथ फौंडेशनच्या वतीने सांगण्यात आले. मर्दानी खेळ सादरीकरण व इतिहास कालीन वेशभूषा मधील सहभागी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.