दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२४ | फलटण |
श्री जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराज बीजोत्सव सन २०२४ श्री सद्गुरु हरीबुवा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट फलटण येथे मिती फाल्गुन शु॥ ११ शके १९४५ बुधवार, दि. २० मार्च २०२४ ते मिती फाल्गुन व॥ २ शके १९४५ बुधवार, दि. २७ मार्च २०२४ अखेर संपन्न होणार आहे.
या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये दररोज सकाळी ७.३० ते ८.३० हरिपाठ, दररोज सकाळी ९ ते १० श्री संत तुकाराम महाराज गाथा भजन श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सांप्रदायिक भजन मंडळ, फलटण व इतर भाविक मंडळ, दुपारी ३ ते ५ फलटण शहरातील महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन, सायं. ७ ते ९ कीर्तन सेवा, कीर्तन साथ श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सांप्रदायीक भजनी मंडळ फलटण व पंचक्रोशीतील भजनी मंडळे.
बुधवार दि. २० मार्च २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ गीता माऊली भजनी मंडळ यांचे भजन, सायं. ५ ते ६ नंदकुमार कुमठेकर महाराज नांदल यांचे प्रवचन.
गुरुवार, दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ नाम साधना ध्यान मंदिर श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आरती मंडळ यांचे भजन, सायंकाळी ५ ते ६ ह.भ.प. रामभाऊ जगताप महाराज वाठर निंबाळकर यांचे प्रवचन, सायं. ७ ते ९ ह.भ.प. रामभाऊ जगताप महाराज वाठार निंबाळकर यांचे कीर्तन.
शुक्रवार, दि. २२ मार्च २०२४ रोजी दादा महाराज भजनी मंडळ फलटण यांचा आरती कार्यक्रम, सायं. ५ ते ६ ह.भ.प. आबा महाराज मोहिते मुळीकवाडी यांचे प्रवचन, सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प. आबा महाराज मोहिते मुळीकवाडी यांचे कीर्तन.
शनिवार, दि. २३ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ भजन केसरकर महिला भजनी मंडळ, फलटण यांचे भजन, सायंकाळी ५ ते ६ प्रा. बनकर सर तावडी यांचे प्रवचन. सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प. सतीश महाराज खोमणे, कोर्हाळे यांचे कीर्तन.
रविवार, दि. २४ मार्च २०२४ रोजी आरती कार्यक्रम श्री सद्गुरु हरिबुवा महाराज भजनी मंडळ, फलटण, सायंकाळी ५ ते ६ ह.भ.प. आनंद महाराज सुळ सस्तेवाडी यांचे प्रवचन, सायंकाळी ७ ते ९ ह. भ. प. स्वानंद महाराज, सस्तेवाडी यांचे कीर्तन.
सोमवार, दि. २५ मार्च २०२४ रोजी ३ ते ५ केशव स्मृती महिला भजनी मंडळ फलटण यांचे भजन, सायंकाळी ५ ते ६ ह. भ. प. येवले सर यांचे प्रवचन, सायंकाळी ७ ते ९ ह. भ. प. दशरथ महाराज फडतरे, धुमाळवाडी यांचे कीर्तन.
मंगळवार, दि. २६ मार्च २०२४ रोजी दुपारी ३ ते ५ शारदा महिला भजनी मंडळ, फलटण यांचे भजन, सायंकाळी ५ ते ६ पुष्पाताई कदम यांचे प्रवचन, सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प. सुनील माने महाराज, तावशी यांचे कीर्तन.
बुधवार, दि. २७ मार्च २०२४ रोजी तुकाराम बीज मुख्य दिवस. ह. भ. प. सत्यवान महाराज जाधव नांदल यांचे कीर्तन सकाळी १० ते १२, श्री संत तुकाराम महाराज वैकुंठ गमणाचे आणि दुपारी १२ ते १ काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद होईल.
या सर्व कार्यक्रमांना भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन श्री सद्गुरु हरिबुवा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, ता. फलटण, जि. सातारा यांच्या वतीने करण्यात आले आहे.