फलटण आगाराची श्री अष्टविनायक दर्शन बस रवाना


स्थैर्य, फलटण, दि. १६: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्री अष्टविनायक दर्शन बसचे वाहतूक नियंत्रक श्री अमोल वडगावे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून बस अष्टविनायक दर्शन साठी रवाना करण्यात आली.याप्रसगी एस टी को ऑपरेटीव्ह सोसायटी चे संचालक श्री दत्तात्रय धुमाळ, वाहतूक नियंत्रक श्री धनंजय कुलकर्णी चालक तानाजी भिवरकर, वाहक श्रीपाल जैन व  भावीक भक्त उपस्थित होते.

वाहतूक निरीक्षक श्री अमोल वडगावे यांनी भावीक भक्तांना  अष्टविनायक दर्शन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानुन शुभेच्छा दिल्या . ऊद्या विनायक चतुर्थी असल्याने श्री गणेशाचे दर्शन घडणार आहे .आजचा मुक्काम ओझर या ठिकाणी होणार असून ऊद्या संध्याकाळी अष्टविनायक दर्शन यात्रा परत फलटण ला येईल.


Back to top button
Don`t copy text!