दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । कोळकी । सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे म्हणजे फलटण तालुक्यातील सर्वसमावेशक नेतृत्व आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्याचा संपूर्ण विकासासाठी कायमच कार्यरत असतात. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या निधीमधून कोळकी येथील ईरिगेशन बंगला प्राथमिक शाळेमध्ये नुतन संगणक प्रणाली मंजुर करून संगणक प्रणालीचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना आगामी काळामध्ये उत्तमोत्तम शिक्षण यामाध्यमातून नक्कीच मिळेल, अशी खात्री यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी व्यक्त केली.
कोळकी येथील ईरिगेशन बंगला प्राथमिक शाळेमध्ये संगणक प्रणालीचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे बोलत होते. यावेळी सरपंच विजया नाळे, उपसरपंच संजय कामठे, सदस्य विकास नाळे, शिवा भुजबळ, सौ. प्राजक्ता काकडे, सौ. रूपाली चव्हाण, सौ. स्वप्ना कोरडे, सौ. सोनाली जठार, सौ. निर्मला जाधव, रमेश नाळे, माऊली शिंदे, गणेश शिंदे, डॉ. अशोक नाळे उपस्थित होते.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे फलटण तालुक्यातील सर्वसामान्य घटकांना समावुन कामकाज करत असतात. फलटण तालुक्याच्या प्रत्येक गावचा विकास साधण्यासाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे कायमच कार्यरत असतात, असे मत कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ईरिगेशन बंगला कोळकीच्या कामकाजाची सविस्तर माहिती मुख्याध्यापक विकास बाबर यांनी यावेळी दिली.