‘स्थैर्य’चे सातत्य कौतुकास्पद : ना.श्रीमंत रामराजे; श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२१ । फलटण । फलटणमधून गेली 23 वर्षे माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या दैनिक ‘स्थैर्य’चे सातत्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.

ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते येथील ‘लक्ष्मी – विलास’ या त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष व सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ‘स्थैर्य’ ने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सातारा जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, सुभाष भांबुरे, गुरुयात्राचे शंतनु रुद्रभटे, निंभोरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकुंद रणवरे (काका), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फलटण तालुकाध्यक्ष सतीश माने यांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!