दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
श्रीदत्त इंडिया साखर कारखाना शेतकर्यांची दिवाळी गोड करणार असून मागील वर्षी गाळपास आलेल्या उसाला दुसरा हप्ता प्रति टन १०० रूपयांप्रमाणे देणार असल्याचे विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या पाचव्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी सांगितले.
यावेळी महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री, श्रीदत्त इंडियाचे संचालक चेतन धारू, करण रूपारेल, कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, सूरज बांदल यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीमंत रामराजे म्हणाले, श्रीदत्त इंडिया साखर कारखाना दरवर्षी शेतकर्यांना उसाच्या एफआरपीची संपूर्ण रक्कम एकाच हप्त्यामध्ये देत असतो. मात्र, यावर्षी शेतकर्यांनी केलेल्या मागणीचा सकारात्मक विचार करून कंपनीचे संचालक प्रीती रूपारेल व जितेंद्र धारू यांनी शेतकर्यांना दिवाळीपूर्वी अधिकचे १०० रुपये देणार असल्याचे कबूल केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास चिफ इंजिनिअर अजित कदम, को-जन मॅनेजर दीपक मोरे, कॅन मॅनेजर सदानंद पाटील, फलटण तालुका साखर कामगार युनियनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सेक्रेटरी राजेंद्र भोसले, पोपटराव भोसले, गोरख भोसले, पै. संतोष भोसले, महेश भोसले, संजय जाधव, शेतकी अधिकारी बागनवर, चिफ केमिस्ट नितीन नाईकनवरे, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, डिस्टिलरी मॅनेजर विजय जगताप, डेप्युटी चिफ इंजिनिअर किशोर फडतरे, ईटीपी मॅनेजर सचिन भोसले, डब्ल्यूटीपी मॅनेजर बुनगे, सुरक्षा अधिकारी अजय कदम, अमर निंबाळकर, संजय भोसले, शरदराव जाधव, संतोष शेंडगे, शेतकरी व कामगार उपस्थित होते.