दैनिक स्थैर्य | दि. १० ऑक्टोबर २०२४ | फलटण |
१२४० मध्ये राजघराण्यातील पहिले शूर, कर्तृत्त्ववानराजे निंबराज यांनी निंबळक येथे श्री निंमजाईदेवीची स्थापना केली. म्हणून या गावास ‘निंबळक’ असे ओळखले जावू लागले. त्या ठिकाणी महिपतगड हा भुईकोट किल्ला बांधून त्यात वास्तव्य केले. तेव्हापासून राजा निंबराज यांचे वंशज निंबळक येथील ३१ वी पिढी श्रीमंत शंभूसिंग पृथ्वीराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते वंशपरंपरेनुसार चालत आलेले नवरात्र उत्सवाचे कार्यक्रम तसेच दसरा सप्ताह, श्री निंमजाईदेवीची महाआरती व शिलंगण पार पडते. तसेच निंमजाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री रामसाहेब निंबाळकर यांच्याही हस्ते श्री निंमजाईदेवीची आरती संपन्न होते.