दैनिक स्थैर्य । दि. १२ सप्टेंबर २०२२ । सातारा । पर्यावरण पूरक कृषी व औद्योगिक समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचा दिनांक 15 सप्टेंबर रोजी कराड येथील पलाश मंगल कार्यालयामध्ये वार्षिक महामेळावा आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या मेळाव्यामध्ये पुढील वर्षाचा संपूर्ण कार्यक्रम निदर्शिका जाहीर केली जाणार आहे.
डॉक्टर भारत पाटणकर यांनी या महामेळाव्याची माहिती पत्रकारांना पत्रकार परिषदेत दिली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित संवाद कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले पर्यावरण संतुलित समृद्ध आणि विकसनशील कृषी औद्योगिक समाज निर्माण करण्याकरता श्रमिक मुक्ती दलाने कराड येथे पलाश मंगल कार्यालयामध्ये वार्षिक महामेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याला सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर ,औरंगाबाद, रायगड,सिंधुदुर्ग, रत्नागिरी नंदुरबार ,मुंबई,येथील दहा हजार सदस्य उपस्थित राहणार आहेत हा मेळावा गेल्या दोन वर्षापासून करोनाच्या निमित्ताने होऊ शकला नव्हता 15 सप्टेंबर हा दिवस दिवंगत इंदुमती पाटणकर यांचा जयंती दिन असून या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांमध्ये श्रमिक मुक्ती दलाने अलिबाग रायगड येथे वारंवार आंदोलने करून रिलायन्स आणि अदानी यांचे कोळसा रिफायनरी चे उद्योग सनदशीर मार्गाने आंदोलन करून मागे घेणे भाग पाडले येथे हरित औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासंदर्भात राज्य शासनाने पावले उचलली आहेत हे श्रमिक मुक्ती दिनाच्या आंदोलनाचे मोठे यश आहे याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील आटपाडी सांगोला तासगाव येथे समन्याय पाणी वाटपाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून हा कार्यक्रम पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे येथे प्रत्येकाला 1000 घनमीटर पाणी शेतीसाठी दिले जाणार आहे त्यामुळे भागातील शेतकऱ्यांचे आयुष्य समृद्ध होणार आहे हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रयोग राबवण्यात येत असे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत याशिवाय पवन चक्की क्षेत्रामध्ये ही श्रमिक मुक्तिदांना लढा उभारला आहे पवनचक्की कंपन्यांना दर मेगाव्हेट ला पंधरा हजार रुपये अनुदान ग्राम पंचायतीला द्यावे असा ठराव राज्य शासन तयार करत असून यामागे श्रमे मुक्ती दलाचा मोठा वाटा आहे याचा अध्यादेश लवकरच जाहीर होत असून ग्रामपंचायत देना सुद्धा अनुदानाच्या निमित्ताने आर्थिक उत्पन्नाचा मोठा आधार मिळणार आहे या तिन्ही ठरावांचे विशेष अभिनंदन मेळावे घेतले जाणार आहेत व पुढील वर्षाचा कृती कार्यक्रम ही यावेळी निमित्ताने जाहीर केला जाणार आहे असे डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितले.